संतोष पोटपिल्लेवार
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:-भारतीय जनता पार्टी केंद्रीय निरीक्षकाच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्ष विधीमंडळ गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली.याप्रसंगी आज रोज बुधवार ला दुपारी १२ वाजता भारतीय जनता पक्षाने तालुका स्तरावर एकत्रित येऊन झेंडे,ढोल (बँड) ताशांच्या गर्जनेसह व फटाक्यांच्या आतिषबाजीने जल्लोष साजरा केला. आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांच्या सूचनेनुसार घाटंजी तालुक्यातील व शहरातील पदाधिकाऱ्यांनी व भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी घाटंजी शहरातील पालतेवार कृषी केंद्रा जवळून ते पोलीस स्टेशन जवळील जयस्तंभ चौका पर्यंत फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष रॅली काढण्यात आली. पोलीस स्टेशन जवळील जयस्तंभ चौकात शहिद स्मारकाला यावेळी पुष्पहार अर्पण करुन रॅली ची सांगता करण्यात आली.यावेळी भाजपा चे तालुका अध्यक्ष सुरेश डहाके, शहर अध्यक्ष राम खांडरे, मधुसुदन चोपडे, संजय गोडे, चंद्रकांत इंगळे, पुंडलिक वाढई, दत्ता कोंडेकर,
नंदकिशोर डंभारे, बंडू तोडसाम, गिरीधर राठोड,बाळू जाधव, गणेश अस्वले, मुज्जू पटेल, गोपाल काळे,सह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.