संतोष पोटपिल्लेवार
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी : सम्यक दृष्टि क्षमता विकास एंव अनुसंधान मंडळ तथा दिव्यांग संघटना ता.घाटंजी च्या वतिने ३ नोव्होबर रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राम मंदीर येथे दूपारी १२ वा दिव्यांग मार्गदर्शन व समउपदेशन माहीती पर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रम चे अध्यक्ष स्थानी घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजु घोडके होते. तर प्रमुख वक्ता विजय लिलरवे, प्रमुख पाहूणे भरत तायडे, व तायडे मॅडम, मधूकर निस्ताणे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा शिंपी समाजाचे अध्यक्ष सचिन कर्णेवार रुपेश कावलकर रोहीदास जाधव, ढोले, देशमुख, व ईतर मान्यवर मंचकावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सूरवात भारत माता, दिव्यांग प्रेरणा देणा-या हेलिन कीनर,सूरदास महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. नंतर उपस्थित मान्यवरांचे आयोजक मंडळींच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी उपस्थिति दिव्यांग बांधवास मार्गदर्शन करतांना नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके यांनी नगर परिषद व्दारा देण्यात येणा-या विविध लाभाबाबत माहीती दिली तसेच शासनाच्या योजनाचा लाभ दिव्यांगास मिळवून देण्यात आपण कटीबध्द असल्याचे सांगितले. मधूकर निस्ताणे यांनी विशेषत: दिव्यांग हा शारिरिक कमवूत असला तरी कलागुण संपन्न असतो दैविक अद्भूत देन त्यांना असते त्यावर भर देत काही दिव्यांग जगाला प्रेरणास्रोत ठरले असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक विजय लिलरवे यांनी सम्यक ची दिव्यांग बाबतची कार्यप्रणाली विषद करत शासकीय यादीत दिव्यांग च्या २१ प्रवर्गाचा समावेश असून विवीध कामात दिव्यांग उपरोक उल्लेखनीय कार्य करत असल्याचे सांगितले.
शिवाय ज्या मोठमोठ्या कंपनीत मशिनचा करकष्य आवाज येतो तेथे सर्वसामान्य आवाजाने काम करण्यास धरातल नाही तेथे कर्णबधिर सारखा दिव्यांग घटक साजेस काम करतो व कंपनीचा स्त्रोत करते हेही उदाहर देत दिव्यांग कामाची माहिती विषद केली. सुदृढ़ समाजातील हा वंचित दूर्लक्षीत घटक असून शासनाने यांच्या उत्थानासाठी विविध उपाय योजना कराव्यात हे स्पष्ट ष्ट मत व्यक्त केले.कार्यक्रम प्रसंगी उत्तम संचालन प्रविण कर्णेवार यांनी केले तर कर्णबधिर समर्थ विद्यालयाचे शिक्षक ढोले, अमोल कर्णेवार,यांनी उपस्थित कर्णबधिर बहूसंख्यक विद्यार्थि वर्गास त्यांचे विशिष्ठ हातवा-यांचे शैलितून मान्यवरांचे मनोगत, माहीती विद्यार्थी वर्गास दिली. विशेष म्हणजे या प्रसंगी सर्वप्रकारच्या दिव्यांग बांधवांनी त्याचे संबधी व्यग्ती, पालक वर्ग यांनी उत्फूर्त सहभाग दिला होता. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता गजू राऊत, नंदकिशोर काळे,विनोद धांदे, संतोष पोटपिल्लेवार,मनोज महाजन, प्रशांत कलांद्रे, देशमुख,राम भाद्कर, सचिन भेडांरकर,छायाताई चौरागडे, कुलकर्णी,तथा ईतर ही दिव्यांग बांधव यांनी परिश्रम घेतले.उपस्थिताचे आभार अमोल कर्णेवार यांनी मानले व नंतर उल्पोहार देत कार्यक्रम सांगता करण्यात आली.


