दिपक केसराळीकर
तालुका प्रतिनिधी बिलोली
बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथील मुख्य रस्ताच्या दोन्ही बाजुने बंदिस्त नालीचे होत असलेले बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे. अशी मागणी मौजे गंजगाव येथील रहिवाशी वैभव घाटे यांनी निवेदणाद्वारे केली आहे.रस्ताच्या दोन्ही बाजुने बंदिस्त नालीचे बांधकाम चालु आहे.अनेक वर्षानंतर मुख्य रस्ता व नालीचे काम मंजुर झाले आहे. परंतु बांधकामा मध्ये वापरण्यात येणारे सिमेंट निकृष्ट दर्जाचे वापरले जात आहे. त्यामुळे बंदिस्त नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असुन,काम पुर्ण झालेले नसतानाही बंदीस्त नालीवरच्या छताला भेगा पडत असुन निकृष्ट दर्जाच्या कामाची स्थिती पहाता सदरचे बंदिस्त नालीचे बांधकाम हे जास्त दिवस टिकण्याची शक्यता दिसुन येत नाही. हे काम पुसद येथील दिपक पाटील वारोडे यांच्या कंन्स्ट्राक्शन ला दिलेले असुन, सदरचे निकृष्ट दर्जाचे काम हे पुसद येथील कंञाटदार करत आहेत.बिलोली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कंञाटदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. “आओ चोरो बांधो भारा,आधा तुम्हारा आधा हमारा “असे म्हणत
या बाबीकडे सार्वजनिक विभागाचे अभियंता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित आहेत.त्यामुळे गंजगाव येथिल निकृष्ट बंदिस्त नाली बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी वैभव घाटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक, अभियंता यांच्या कडे केली आहे.








