कैलास शेंडे
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
“मूक बधिर ,मतिमंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य..
भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघच्या उपक्रम……”
नंदुरबार: दुधाळे येथील मनू देवी फाउंडेशन संचलित मूक बधीर निवासी विद्यालय व काकुमाय बहुउद्देशिय अपंग सेवा संस्थान निवासी मतिमंद मुलींची शाळा नंदुरबार येथे असून शाळेत ज्ञानार्जन करणारे विद्यार्थी सातपुड्यातील दुर्गम भागातील आहेत तर काही जिल्हाच्या ठिकाणाहून वेगवेगळ्या गावाच्या आहेत कुटुंबापासून दुरावलेले ही मतिमंद व् मूकबधीर बालके यांचे वेगळेच विश्व आहे ,सहसा बाहेरच्या जगाशी त्यांच्या संपर्क नसतो त्यामुळे त्यांचे एक वेगळे जग ते स्वतः निर्माण करून घेतात दुरावलेल्या मतिमंद व मूक बधीर विद्यार्थ्यांचे काय भावना आहेत त्यांच्या भावनेशी एक वेगळे नाते जोडण्याचे काम जागतिक दिव्यांग दिवशी भारतीय जैन संघटना तळोदा , महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ तळोदा ग्रुपच्या वतीने करण्यात आले त्यांना आवश्यक असणाऱ्या कपडे , टी-शर्ट पॅन्ट, खेळणी साहित्य फुटबॉल, बॅडमिंटन,चेंडू विविध प्रकारची गेम वगैरे तसेच आवश्यक किराणा तेल ,डाळ ,पोहे, वगैरे साहित्य देऊन त त्यांच्यासोबत हितगुज करून विविध खेळ खेळून मतिमंद , मुकबधीर मुलाच्या मुलीच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले , मतिमंद व मूक बधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहवासात याअनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी भारतीय जैन संघटनाचे जिल्हाध्यक्ष ,प्रवासी महासंघ चे सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ऍड अल्पेश जैन, कुशल जैन, चेतन धांनका, ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी, संघटक वासू माळी सचिव प्रा.राजाराम राणे ,पंकज तांबोळी ,नितीन पाटील तसेच मूकबधिर व मतिमंद संस्थेचे विनोद चौधरी , ज्ञानेश्वर कोळी मुख्याध्यापक कर्मचारी आदी उपस्थित होते.








