तारा पाटील
जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर : दि .२८ रोजी दुपारी १. ३० वाजता पालघर जिल्ह्यातील बोईसर मध्ये गुजरात गॅस लाईन लिकेज झाल्यामुळे शेकडो कामगारांचे जिव धोक्यात आले असते.परंतू लिकेज नियंत्रण करण्यासाठी अग्निशमन दलाला बोलावण्यात आले व अग्निशमन दल यशस्वी झाले. बोईसर अद्योगिक क्षेत्रातील मे. जे. आर. प्लास्टिक प्लाॅट नंबर जे १८४ या कारखान्या समोर गुजरात गॅस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपन्यांना खासगी गॅस वितरित करणाऱ्या कंपनीचे आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास गॅस पाईपलाईन साठी जेसीबी मशीन ने खड्डा खोदत असताना गॅस लाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने तारांबळ उडाली होती .आग लागून भडका उडून जिवीत हाणी होऊ नये म्हणून समोरील कंपनीचे कामगार घाबरून सैरावैरा पळत होते. यावेळी वेळीच अग्निशमन दलाला बोलावून गॅस गस्तीवर नियंत्रण करण्यात यशस्वी झाले. जिवीत हाणी टळली असून कंपनीच्या बाजूला ठाकूर गॅलॅक्सी इमारतीत मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असून आग लागली असती तर हजारो लोकांचे जिव धोक्यात गेले असते. म्हणजे संवेदनशील धोकादायक गॅस असतांना नियंत्रण ठेवण्यासाठी गॅस आगीवर गुजरात गॅस कंपनीकडे उपलब्ध नाही. त्यामुळे तेथील लोक संताप व्यक्त करत आहेत.