शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचालित एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांना शाळेतील अभिनव उपक्रमांसाठी ईएसएफईकडून स्टार एज्युकेशन अवॉर्ड प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना दि. २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे आयोजित एका विशेष समारंभात देण्यात आला. डॉ.रोडगे यांनी शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नवीन उपक्रम राबवले आहेत. यात रोबोटिक्स लॅब, मोबाईल एक्सपेरि मेंटल लॅब, विद्यार्थी गेमिंग झोन आणि इंग्लिश लँगवेज लॅब यांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक विषयांबरोबरच नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळत आहे.
या पुरस्कारासाठी डॉ. रोडगे यांना शाळेतील शिक्षक, पालक आणि विद्यार्थीवर्ग तसेच श्रीराम प्रतिष्ठान संचलित घटक संस्थेतील प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या .
श्रीराम प्रतिष्ठान ही शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळा आणि महाविद्यालये चालवली जातात.

