देवलाल आकोदे
सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यमवर्गीय स्तरातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्रित येवून समाजातील सर्व जनतेस व दुर्बल घटकांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी सन १९९३ साली वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था स्थापन केली. पतसंस्थेची पहिली शाखा मुकुंदवाडी येथे छोट्याशा जागेत सुरु करण्यात आली होती. ग्राहकांना सेवा देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या संस्थेच्या या एका शाखेचा विस्तार आज एकूण २२ शाखेपर्यंत झाला असून ह्या सर्व शाखा छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात कार्यरत आहेत . “ जनतेच्या विश्वासावरच वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेचा व्यवसाय हा आज रोजी १२०० कोटीच्या वर गेला आहे. तसेच संस्थेच्या सर्व शाखा संगणीकृत व कोअर बँकिंग प्रणालीने जोडलेल्या आहेत. वर्धमान पतसंस्था ही मराठवाड्यातील अग्रगण्य पतसंस्था आहे.
आर्थिक क्षेत्रा सोबत सामाजिक कार्यात हि संस्था नेहमी अग्रेसर असते. ज्या मध्ये प्रामुख्याने रक्तदान, नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी, देहदान व अवयव दान या शिबिरा बरोबरच दरवर्षी महावीर जयंती निमित “स्वच्छ शहर, सुंदर शहर” चा नारा देत छत्रपती संभाजीनगर शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येते. संस्थेच्या वतीने महिलांसाठी आयोजित बचत गट मेळावाच्या माध्यमातून ३००० महिलांना स्वत:च्या पायावर उभे करून स्वयंपूर्ण करण्यात आलेले आहे.दि.२७/११/२०२४ वार बुधवार रोजी वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्या. शाखा खोकडपूरा छत्रपती संभाजीनगर येथे “दिनदर्शिका २०२५” चे प्रकाशन संस्थेचे मा.अध्यक्ष डॉ. शांतीलाल सिंगी व सहकार भारती विभाग प्रमुख श्री.सुनील मोतलग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.पद्माकर कदम संस्थेचे मा. संचालक श्री.संभाजी राचुरे ,श्री.अनंतराव घडामोडे, श्री.अविनाश कोटंबे तसेच खोकडपुरा शाखेचे सल्लागार श्री. प्रफुल्ल अग्रवाल , श्री. आशिष अग्रवाल , श्री.तुषार लुणावत, सौ.शैला कस्तुरे, सौ.सुचिता पालोदकर, शाखा व्यवस्थापक अश्विनी पवार , सर्व कर्मचारी व पिग्मी प्रतिनिधी उपस्थित होते.