शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
परभणी : दि.28 गेल्या काही दिवसांपासून कमी आवक व मागणी अधिक वाढल्याने लसणाला उच्चांकी दर मिळत आहे. त्यामुळे लसूण उत्पादक शेतकर्यात मोठे उत्साहाचे वातावरण आहे.गेल्यावर्षी लसणाला फारसा भाव नव्हता. सर्वसाधारण पणे 100 रुपयास दोन ते तीन किलो एवढ्या दराने लसण मिळत होता. त्यामुळे लसूण उत्पादक शेतकर्यांनी लसणाची लागवडच कमी केली. परंतु, यावर्षी लसणाच्या दरात हळूहळू मोठी वाढ होत गेली. कमी आवक आणि मागणी अधिक त्यामुळे लसणाच्या दरात झपाट्याने वाढ झाली. किरकोळ बाजारात लसूण सद्यस्थितीत 400 रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होत आहे. त्यामुळे लसूण उत्पादकांमध्ये निश्चित च उत्साहाचे वातावरण आहे.दरम्यान,थंडीचा कडाका वाढू लागल्या ने व बाजारपेठांमधून शेतमालाची आवकही घटू लागल्यामुळे भाजी पाल्याचे दरही वाढू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. लसणा पाठोपाठ शेवगा, वांगी, मिर्ची, भेंडी, वटाणा, दोडका, गाजर, दुधी भोपळा, कारले आणि इतर फळभाज्यांना व पाले भाज्यांनाही सद्या बाजारात चांगले दर आहेत. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून मेथीचे दर मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत. लासून उत्पादक शेतकरी राजा सध्या लसनाला चांगला भाव मिळत असल्याने खुश आहे.

