योगेश मेश्राम
ग्रामीण प्रतिनिधी चिमूर
चिमूर : आयुष्याच्या संध्याकाळी एकाकी जीवन जगणाऱ्या निराधार दुःख दारिद्र्य किंवा कलामुळे अनेक लोक घर सोडून कोसो दूर निघून गेलीत आजच्या घडीला त्या व्यक्तींचा सांगपत्ता नाही काही मृत्युमुखी पडलेत तर काही रस्त्यावरच कठीण जीवन जगत आहेत असे अनेक लोक शहरात आढळून येतात. शहरात किंवा गाव खेड्यात बरेच लोक दानशूर असली तरी मात्र असे लोक दिसली तर त्यांना दान तर देतात पण आधार किंवा त्यांचे पुनर्वसन करत नाही उलट त्यांना हाकलून लावण्याचे काम करतात. उन्हाळा पावसाळा हिवाळ्यात ते कसे राहत असतील कसे जीवन जगत असतील. हे समजण्या पलीकडे असले तरी याची जाणीव दिव्य वंदना आधार फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम पसारकर यांनी ती 2022 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील जामगाव या गावी स्थापना केली. सुरुवातीला आठ-दहा निराधारांना जगण्याची उमीद देणाऱ्या शुभम पसारकर यांनी आपल्या यांनी आपल्या फाउंडेशन मार्फत आजपर्यंत 1000 लाभार्थ्यां यांचा उपचार करून काहींना परिवार मिलन करून देण्यात आले शुभम पसारकर यांच्या मते दिव्य वंदना आधार फाउंडेशन हा आमचा केवळ आश्रम नाही तर ते अनेक निराधारांचे हक्काचे माय माऊली मंदिर आहे आज देखील येथे, 400 हून अधिक विविध जसे की एच आय व्ही ,गँगरीन आजारांनी ग्रस्त मनोरुग्ण वृद्ध राहत आहेत गेल्या सहा वर्षापासून शुभम पसारकऱ यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने माय माऊली मंदिरात दाखल झालेल्या आणि देवाज्ञा झालेल्या 50 जणांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम हे केले आहे . आजच्या घडीला पाच वर्षाच्या कालावधीत नागपूरातील 400 बेघर,बेवारस ,भिक्षेकरी अनाथांचा शुभम नाथ झाला. चिमूर क्रांती भूमीतील क्रांतीनगर येथील शुभम राजू पसारकर यांचे परिस्थिती सर्वसाधारण वडील एक वर्षांपूर्वी मरण पावले शुभमची आई हयात आहे शुभम हे नेहरू विद्यालयात बारावीचे शिक्षण कसे बसे पूर्ण करून 2017 ला वयाच्या 17 व्या वर्षी काहीतरी करण्याच्या दृष्टीने नागपूर गाठले किरायाच्या खोलीत राहून बुट्टेबोरी तील विठ्ठल कामत या हॉटेलमध्ये काम करीत असताना अनेक भिक्षेकरी जेवणासाठी यायचे त्या हॉटेलमध्ये येणारे गेस्ट काही अन्न खायचे तर काही फेकून द्यायचे मालक मनोरुग्णांना हाकलून लावायचा हे पाहून शुभम पसारकर यांचे मन गहिवरले मनोरुग्णांसाठी काहीतरी करण्याचा मानस केला. वेटर चे काम सोडून शुभम पसारकर यांनी नागपूर येथील महानगरपालिकेतील शहरी बेघर निवारा मध्ये काम केले केंद्रशासित भिक्षेकरी गृहामध्ये मॅनेजर महनून काम केले पुण्याच्या अभिलाषा इंटरप्राईज मध्ये हेल्पर महनून काम केले नागपुरातील श्री ऑटोमोबाईल मध्ये बॅटरी गाडी रिपेरिंग व एका बिल्डरकडे सुपरवायझर पाणी मारण्याचे काम मानधनावर करत असताना आपल्या मानधनातून व मिळालेल्या दानातून रोडवरील बेघर ,बेवारस ,भिक्षेकरी ,मनोरूघना साठी २०२२ ला फाउंडेशन र.जि केले 60 वर्षावरील काहींना वृद्धाश्रमात ठेवण्याचे काम केले नागपूर शहरात अनेक राज्यातील व्यक्ती कुटुंबाला कंटाळून इतर कारणाने घर सोडून राहत आहेत त्यांना कोणी जवळ करत नाहीत ६ वर्ष प्रचंड मेहनत घेऊन रोडवरील मनोरुग्णांना 14 सप्टेंबर 2024 ला चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील जामगाव येथील शुभम पसारकर यांनी 28 हजार स्क्वेअर फूट स्वतःची जागा या मनोरुग्न लोकांकरिता बाधकामा करीता दीली व दिव्यवंदना आधार फाउंडेशन या नावाची संस्था त्या जागेमध्ये स्थापन केली या संस्थेमार्फत मनोरुग्ण लोकांन करिता सेवा कार्याची सुरुवात केली दाखल होणाऱ्या प्रत्येकांची अतिशय मनोभावे काळजी घेतली जाते दाखल होणारा प्रत्येक माणूस वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त असतो त्या प्रत्येकाच्या समस्या आणि गरजा भिन्न असतात ज्येष्ठांच्या समस्या वेगळ्या असतात त्यामुळे येथे प्रत्येकाची त्याच्या समस्यांनी गरजेनुसार व्यक्तीच्या काळजी घेतली जाते शुभम पसारकर यांनी स्वतःला या मनोरुग्णांच्या सेवेत समर्पित केले येथे येणाऱ्या रुग्णाला केवळ आधार दिला जात नाहीत तर त्यांच्यावर सर्व प्रकारचे मोफत वैद्यकीय इलाज केला जातो आश्रम जवळील भीसी या गावचे डॉक्टर दर हप्त्यामध्ये मनोरुग्णांकरिता सेवा देण्यासाठी येत असतात संस्थेच्या वैद्यकीय पॅनलवर विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांचा घरच्या पत्ता विविध मार्गाने शोधून काढत त्यांनी त्यांच्या हक्काच्या घरी सुखरूप पोहोचवले जाते आतापर्यंत संस्थेमार्फत केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील अनेक राज्यांमध्ये 50 लाभार्थ्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवण्याचे काम केले आहे येथे ज्येष्ठ नागरिकांचे देखील अतिशय मनोभावी सेवा केली जाते. शरीराच्या सुदृढतेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी योगा व्यायाम करून घेतला जातो मनोरंजन आत्मक विविध खेळ खेळले जातात सर्व समुपदेशसन केले जाते भारतातील आजच्या युगामध्ये सुद्धा जाती-धर्म भेदभाव केले जात असून शुभम पसारकर यांना मनोरुग्ण दिसतात तो कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा आहे याचा विचार न करता शुभम पसारकर हे त्या मनोरुग्णांना आपुलकीने जवळ करतो. तसेच त्यांच्या आश्रमात प्रत्येक धर्माचे सर्व सण व उत्सव देखील साजरे केले जातात आज शुभम पसारकर यांच्यासोबत सेवा कार्यामध्ये 50 हून अधिक व्यक्ती गुंतलेले आहेत यामध्ये नर्स पासून विविध तज्ज्ञांचा समावेश आहे शुभम पसारकर हे भविष्यात मोठे मंदिर उभे करणार आहेत.चंद्रपुर,गडचिरोली,गोंदिया, भंडारा जिल्यातील एकमेव केंद्र असुन दिव्यवंदना आधार फाउंडेशन ला नक्की भेट दया.