प्रमोद शिंदे
तालुका प्रतिनिधी माळशिरस
माळशिरस : दहिगाव स्कूल दहिगाव येथे माजी संस्थापक अध्यक्ष कै. विठ्ठलराव पाटील सर(नाना)यांची ८८ वी जयंती विविध उपक्रम माने साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून बालभारती शिक्षण मंडळाचे सदस्य प्रशांत सरूडकर सर यांनी विद्यार्थ्यांना संस्कार विषयावर मार्गदर्शन केले.ते बोलताना म्हणाले की पुस्तकांसारखा जीवनात दुसरा खरा मित्र नाही.पुस्तकांमुळे मनावर व्यक्तींवर चांगले संस्कार होतात.पुस्तकांमुळे या देशात अनेक महान व्यक्ती होऊन गेल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तक वाचन व अभ्यासाच्या जोरावर आपल्या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले.विद्यार्थ्यांनी वाचनाची संधी सोडू नये प्रसंगी रद्दीतील पेपर सुद्धा वाचावा वाचनाने प्रगल्भता येते. छत्रपती शिवाजी महाराज,साने गुरुजी यांच्यावर आईंनी संस्कार केले. पुढे बोलताना ते म्हणाले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नाना यांनी शाळेवर संस्कार केले. ते स्वतः सुसंस्कृत,गणित तज्ञ,शिस्त प्रिय होते,नातेपुते एज्युकेशन सोसायटीच्या ठिकाणी त्यांनी काम केलं खडतर परिश्रम करून ही संस्था वाढवली.विठ्ठलराव पाटील सर यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्षा वंदना देवी मोहिते,सचिव वनिता पाटील,सरपंच पूनम खिलारे,चेअरमन रामचंद्र पाटील, मुख्याध्यापक चव्हाण सर, किर्दक सर,दीक्षित सर,पत्रकार प्रमोद शिंदे,विजय पाटील,महेश चिकन, मेजर सागर पाटील,अभिमन्यू कदम, शिक्षक स्टाफ विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


