संजय डोंगरे
ग्रामीण प्रतिनिधी माना
माना : येथे दिनांक 27 नोव्हेंबर रोजी रात्री एक ते दोन च्या सुमारास एसटी प्रवासी निवाऱ्यात माना येथील एका इसमाचा कडाक्याच्या थंडीने मृत्यू झाल्याची घटना घडली. सविस्तर वृत्त असे की, काल दिनांक २६ नोव्हेंबर सायंकाळपासून माना येथील प्रकाश उर्फ बंडू बापूराव मार्कंड वय 60 वर्ष राहणार रेल्वे स्टेशन माना येथे राहत असलेला इसम पोलीस स्टेशन परिसरात फिरत होता. रात्रीच्या वेळेस त्याची तब्येत बिघडल्याने आश्रय घेण्यासाठी तो एसटी प्रवासी निवाऱ्यात जाऊन झोपला असता, सकाळी सात वाजता कामावर जाणाऱ्या लोकांनी त्याला मृत अवस्थेत बघितले. याची माहिती त्यांनी माना पोलीस स्टेशनला दिली असता, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. माना पोलिसांनी मर्ग क्र. 29/2024 नुसार मर्ग दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार, सुरज सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार इंगळे हे करीत आहेत.


