शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.
विधानसभा निवडणूक : चारही मतदारसंघातील चित्र.परभणी : दि.17लोकसभे पाठोपाठ विधानसभा निवडणू कीतसुध्दा मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील फॅक्टर निश्चितच परिणाम कारक ठरणार, असे सकृतदर्शनी चित्र दिसत आहे.या विधान सभा निवडणूकीत या जिल्ह्यातील चार मतदारसंघात संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील हे स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरवणार की, अन्य पक्षांच्या उमेदवारास समर्थन जाहीर करणार या विषयी महाविकास आघाडीसह महायुती तील नेतेमंडळींसह इच्छुकांमधून कमाली ची उत्कंठता निर्माण झाली होती. परंतु, उमेदवारी अर्ज माघारी च्या अंतीम दिवशी म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी जरांगे पाटील यांनी स्वतंत्रपणे निवडणूक न लढवि ण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयीची उत्कंठता संपुष्टात आली. परंतु, जरांगे पाटील यांनी स्वतंत्र पणे निवडणूक न लढविली तरी लढती च्या अंतीम टप्प्यात जरांगे पाटील हे काही मेसेज देणार का? की तटस्थपणा राखणार? त्यांचे कट्टर समर्थक त्या-त्या मतदारसंघात कोणती भूमिका बजावणार? या विषयी तर्क-वितर्क व्यक्त होण्यास सुरुवात झाली. तेव्हा राजकीय वर्तूळाच्या पुन्हा भूवया उंचावल्या.मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकरीता संघर्ष योध्दा जरांगे पाटील यांनी अन्य जिल्ह्यां प्रमाणे या जिल्ह्यात सुध्दा मोठी चळवळ उभी केली. विशेषतः चारही मतदारसंघां तर्गत वाडी तांड्यां पासून खेड्या पाड्या पर्यंत तसेच शहरी भागातूनसुध्दा या चळवळीतील धरणे, उपोषण, रास्तारोको असो मोर्चांनासुध्दा उदंड प्रतिसाद मिळाला. सर्व स्तरा वरील सकल मराठा समाजातील नव्या पिढीसह युवती व महिलांनीसुध्दा या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे या जिल्ह्यात ग्रामीण असो की शहरी भागात ठिकठिकाणी शक्ती प्रदर्शनासतून मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती झाली. लोक सभा निवडणूकीत त्याचे प्रत्यंतर उमटणार हे स्पष्टच होते. अपेक्षे प्रमाणे निकालातून महायुतीविरुध्दचा रोष मोठ्या प्रमाणावर मतदानातून, मतमोज णीतून दिसून आलाच. त्यामुळेच विधानसभा निवडणूकीतसुध्दा या चळवळीचे साद- पडसाद निश्चितपणे उमटणार हे स्पष्टपणे दिसू लागले होते. त्यामुळेच या जिल्ह्या तील चारही मतदार संघात महायुतीतील इच्छुकांनी तीव्र रोषा बाबत तर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी व त्यांच्या इच्छुकांनी ती चळवळ कितपत पुरक ठरु शकेल, या विषयी सर्वार्थाने चाचपणी केली. आता प्रत्यक्ष लढतीत, प्रचारयुध्दा च्या अंतीम टप्प्यात महाविकास आघाडी च्या उमेदवारांनी जरांगे पाटील फॅक्टरचा आपणास पूरेपूर अनुकूल ठरावा व त्याद्वारे विरोधकांना नामोहरण करावे, या दृष्टीने मोठा आटा पिटा सुरु केला आहे. गंगाखेड मतदारसंघात हे चित्र प्रकर्षाने स्पष्टपणे दिसत आहे. आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांच्या पाठीशी मराठा समाजाची एकगठ्ठा वोट बँक भक्कमपणे उभी रहावी म्हणून शिवेसेना नेेतेमंडळी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. मात्र, पाथरी, परभणी व जिंतूर या ठिकाणी पेच प्रसंग उभे राहिले आहे त. त्याचे कारणही स्पष्ट आहे. परभणी मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राहुल पाटील विरुध्द महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या तील लढाई मराठा समाजासमोर प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे. कारण आमदार पाटील यांच्यापेक्षा भरोसे यांच्या सगे सोयर्यांचा या मतदार संघात मोठा प्रभाव आहे. तर पाथरीत सुध्दा महाविकास आघाडीचे आमदार सुरेश वरपुडकर यांच्या तूलनेत महायुतीचे आमदार राजेश विटेकर यांच्या सगे सोयर्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळेच मोठी संभ्रमावस्था आहे. जिंतूरातसुध्दा विद्यमान आमदार सौ. मेघना साकोरे- बोर्डीकर व माजी आमदार विजय भांबळे यांच्यातील तूल्यबळ लढाईत जरांगे पाटील फॅक्टर कोणास पूरक ठरणार? हा उत्कंठता निर्माण करणारा विषय ठरला आहे. या मतदार संघात बोर्डीकर यांचा सुध्दा मोठा गोतावळा आहे. तर जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक गणेश काजळे पाटील असो, अन्य भांबळे यांच्या समर्थना ची भूमिका घेवू लागले आहेत. यामुळे मराठा समाज ज्या उमेदवारा ला मतदान करील तो उमेदवार निश्चितपणे निवडून येईल.


