सुरेश नारायणे तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव :–मनमाड शहराच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन असलेल्या वचननाम्याची सध्या शहरातजोरदारआहे.मनमाडनांदगाव-मालेगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार तथा माजी खासदार समीर भुजबळ यांनी हा वचननामा जनतेसमोर मांडला आहे. त्यात मनमाड शहरामध्ये भव्य उड्डाणपूल,अत्याधुनिक रेल्वे स्टेशन, शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आदींचा समावेश आहे.समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ डॉ. शेफाली भुजबळ यांच्या नेतृत्वात शहरातील गांधी चौक, पिंपळवाडा, कुंभारवाडा, मुक्तांगण जिमखाना आदी परिसरात वचननामा घरोघरी देण्यात आला. यावेळी योगिता पाटील, स्वरूपा खेडकर, मीनाक्षी काकळीज, अपर्णा देशमुख, माया झाल्टे, पूजा वाघ आदी महिला सहभागी झाल्या. मनमाड शहराला स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्याचा संकल्प भुजबळ यांनी सोडला आहे. तसेच या शहरामध्ये मुलभूत सोयी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. त्यात अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, भूमिगत गटारी, भूमिगत जलवाहिन्या, घंटागाडीची दररोज उपलब्धता आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, समीर भुजबळ हे खासदार असताना मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक शहरामध्ये भव्य उड्डाणपूल साकारला. त्याच धर्तीवर मनमाड शहरामध्ये पुणे इंदूर महामार्गावर उड्डाणपूल साकारण्याची घोषणा भुजबळ यांनी केली आहे. एकूण १२ पानी असलेल्या वचननाम्याचे शहराच्या सर्वच भागात स्वागत होत आहे. पहिल्यांदाच मनमाड शहराच्या सर्व समस्या आणि अडचणींचा एवढा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे विकासाचा भुजबळ पॅटर्न आम्हाला हवा आहे. अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे. सोनार गल्ली, सुभाष रोड परिसरात मनमाड शहराध्यक्ष व मनमाड बाजार समितीचे सभापती दीपक गोगड,आनंद बोथरा आदी सहभागी झाले येत्या २० तारखेला मतदान यंत्रावरील शिट्टी या निशाणी शेजारील बटण दाबून समीर भुजबळ यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन डॉ.भुजबळ यांच्याबरोबरच अन्य महिलांनी केले.