प्रशांत मुनेश्वर शहर प्रतिनिधी नांदेड.
नांदेड – महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४. व नांदेड लोकसभा पोटनिवडणूकी च्या अनुषंगाने नांदेड लोक सभेचे उमेदवार अविनाश भोशीकर , विधान सभेचे उमेदवार ,प्रशांत इंगोले , फारूक अहमद ,शिवा भाऊ नारंगले , सुरेश राठोड , डॉक्टर विभुते , सुशीलकुमार देगलूरकर ,दिलीप राठोड , डॉक्टर पुंडलिक आमले , या प्रमुख उमेदवारांच्या प्रचारार्थ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची सभा दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रविवार ला नवीन मोंढा येते आयोजित केली होती.सभेला उपस्थित प्रचंड जनसमुदाय जमला होता आणि नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची बाग फुलविणारे नांदेड जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे पक्ष निरीक्षक सर्वोजित बनसोडे यांनी आपल्या रुबाबदार शैलीत उमेदवारांना व उपस्थित जनसमुदाय यांना ऊर्जा निर्माण करुन दिली. बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या तब्येतीची पर्वा न करता उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना सांगितले आम्ही मानुसकीचे पुजारी आहोत आम्ही तर लढत राहु आरक्षणाची लढाई ही रस्त्यावर ची नसुन त्यासाठी आपल्याला आपले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विधानसभेत निवडून पाठवावे लागतील असे उद्गागार काढताच प्रचंड टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता सर्वात महत्त्वाचे म्हणजे नांदेड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभचे सर्व उमेदवार मंचावर उपस्थित होते तसेच नांदेड लोकसभेचे उमेदवार आविनाश भोसीकर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करुन बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सभेची सांगता केली.