शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
जिंतूर विधानसभा मतदारसंघ : जोरदार जाहीर सभा.जिंतूर : दि.17 एससी, एसटी व ओबीसी आरक्षण वाचविण्या करीता सर्वसामान्य मतदारांनी वंचित बहुजन आघाडीस साथ द्यावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.जिंतूर विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि.17) आंबेडकर यांची जिल्हा परिषद मैदानावर मोठी सभा आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.ज्याप्रमाणे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण न्यायालया मार्फत थांबवण्यात आले. त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी ठिकाणी ओबीसी उमेदवारांना आरक्षण नसल्याने उमेदवारांना संधी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले. यापुढे राजकीय व नोकरीत देखील आरक्षण गोठवून टाकले जाऊ शकते, असा इशारा देवून आंबेडकर यांनी एससी, एसटी समाजा च्या आरक्षणातदेखील एका कुटुंबात एकदा आरक्षणाचा लाभ मिळल्यास त्या कुटुंबातील इतर सदस्यांना मात्र एससी, एसटी, प्रवर्गातून आरक्षण मिळणार नाही, असे डावपेज खेळले जात आहेत, त्यामुळे समाज बांधवांनी पूर्णतः सावध राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.प्रेषीत मोहम्मद पैगंबर सह महापुरुषांच्या बाबतीत अलिकडे मोठ्या प्रमाणावर बेताल वक्तव्य केल्या जावू लागले आहेत. परंतु, त्याविरोधात कोणा विरुध्दही गुन्हे दाखल करीत कठोर कारवाई केली जात नाही, अशी खंत व्यक्त करीत त्या संदर्भात कठोर कायदे झाले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री म्हणतात आम्ही बाबरी मशीद पाडली, तेव्हा मुस्लिम समाजाने त्यांचे हे वक्तव्य गांभीर्याने घेतले पाहिजे. महाराष्ट्रातील 32 विधानसभेच्या जागेवर शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवारांसमोर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजाने त्या लढतीत वंचितच्या पाठीशी भक्कम ताकद उभी केली पाहिजे, असे ते म्हणाले.