सिध्दोधन घाटे जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. १७ नोव्हेंबर २०२४ बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार धनंजय पंडितराव मुंडे यांच्या प्रचारार्थ बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत आशोक चक्र आणि जय भीम नावाचा अवमान करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी निवडणूक अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांचे पक्षप्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचार सभा प्रचार फेऱ्या मारत असताना मात्र अनेक ठिकाणी अनुचित प्रकार घडताना दिसतात. अशाच प्रकारे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुका असलेले घाटनांदूर गाव या ठिकाणी २३३ परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार धनंजय पंडितराव मुंडे यांच्या प्रचारार्थ घाटनांदूर येथे दि १५ नोव्हेंबर २०२४ वार शुक्रवार रोजी जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचे आयोजक आणि महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आंबेडकरी समाजाची अस्मिता असलेल्या जय भीम नावाचा आणि राष्ट्रध्वजाची शान असलेल्या आशोक चक्राची निळ्या रंगाचा पट्टी पंकजा मुंडे यांच्या डमी कट आउटच्या कंबरेला बांधून जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने हे कृत्य घडवून आणले असल्याचे मत घाटनांदूर येथील बौद्ध समाजातून येत आहे. निळा रंग आशोक चक्र आणि जय भीम नाव हे बौध्द समाजाची आणि सर्व भारतीयांची अस्मिता असलेल्या आशोक चक्राचा अवमान करून बौद्ध समाजाच्या अस्मितेवर घाला घालण्याचे काम या प्रचार सभेच्या कार्यक्रमातून केले असून या घटनेची सखोल चौकशी करून घाटनांदूर येथील या प्रचार सभेचे आयोजक आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार धनंजय पंडितराव मुंडे व त्यांच्या सोबत असलेले कार्यकर्ते यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून गुन्हा दाखल करून आंबेडकरी समाजास न्याय द्यावा असे निवेदन परळी वैजनाथ येथील मुख्य निवडणूक अधिकारी यांना देण्यात आले आहे.