कमलेश दुर्गे
ग्रामीण प्रतिनिधी अहेरी
अहेरी : नागविदर्भ आंदोलन समितीचे अधिकृत उमेदवार अम्ब्रिशराव आत्राम यांनी मुलचेरा तालुक्यातील विविध गावात घेतला कॉर्नर सभा घेतल्या. अनेक गावात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कॉर्नर बैठक घेऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी या भागात केलेल्या विकासकामांची पावती म्हणून मला मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत अशी आग्रहाची विनंती अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली. अनेक वर्षापासून रखडलेली कित्येक कामे मार्गी लावली. जे कामे २५ वर्षात झाले नाही ते मी अवघ्या ५ वर्षात करून दाखवली, मी मंत्री असतांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ या भागातील नागरिकांना मिळवून दिला. तरी जनतेने मला भरभरून आशीर्वाद द्यावेत अशी अपेक्षा यावेळी अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केली. यावेळी प्रत्येक गावातील नागरिकांनी कॉर्नर सभेत मोठ्या उत्साहाने स्वागत करत आपला सहभाग नोंदविला. प्रसंगी ग्रामस्त व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








