कैलास शेंडे
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार:तळोदा-तळोदा पोलिसांनी आमलाड बहुरूपा रस्त्यावर गुजरात मधून चोरटी वाहतूक करून महाराष्ट्रात आणला जाणारा प्रतिबंधित साडे चार लाखाचा गुटखा व 5 लाखाचे वाहन असा साडे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की तळोदा पोलिसांनी मिळालेल्या माहिती नुसार तळोदा तालुक्यातील बहुरूपा रस्त्यावर आमलाड गांवातील गुजर गल्लीत 8 तारखेच्या रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास स्विफ्ट डिझायर वाहन पकडले व त्याची तपासणी केली असता त्यात 56 पांढऱ्या व निळ्या रंगाचा गोण्या मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा व व्ही वन तंबाखू चे पाऊच आढळून आले त्याची किंमत 3 लाख चौदा हजार असून स्विफ्ट डिझायर वाहन 5 लाख किंमतीचे व एक आय फोन मोबाईल चाळीस हजार किंमतीचा असा ऐकून आठ लाख 54 हजार रु किंमतीचा ऐवज तळोदा पोलिसांनी जप्त केला आहे संशयित नफिस हाफिज तेली हा सदरचा माल गुजरात राज्यातील निझर तालुका निझर येथील नरेंद्र जयस्वाल यांच्या कडून विकत घेऊन महाराष्ट्रात अवैध पणे विक्री करण्याचा उद्देशाने साठा करून वाहतूक करून घेऊन जात असतांना आढळून आला या प्रकरणी तळोदा पोलिसात संशयित नफिस हाफिज तेली वय- 22 वर्ष रा- म्हसावद तालुका शहादा व नरेंद्र जयस्वाल(पूर्ण नांव माहीत नाही) रा निझर तालुका निझर गुजरात यांच्या विरोधात गु र क्र 334/2024 भा न्या सं कलम 123,223,274,275 सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम 26 व 59 मधील उपकलमन्वये पो हे का विजय जावरे तळोदा पो स्टे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास स पो नि राजू लोखंडे यांच्या आदेशानुसार पो उ नि धर्मेंद्र पवार करीत आहेत