सुमेध दामधर
ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांची ०७ नोव्हेंबर रोजी शिवसृष्टी मंगल कार्यालय वानखेड फाटा संग्रामपूर येथे प्रचार दौरा सभा मोठ्या लाखोच्या संख्येने थाटामाटात संपन्न झाला. युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्या या प्रचार सभेसाठी खेड्यापाड्यातून गरीब वर्ग, मजूर वर्ग, युवा महिला मंडळ खूप मोठ्या लाखोच्या संख्येने उपस्थित होते. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रवीण पाटील यांच्या प्रचारार्थ या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुजातदादा आंबेडकर यांनी विरोधक यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. प्रस्थापिकांनी तांड्यावरती हल्ला केला, वस्तांवरती हल्ला केला, आपल्या घरामध्ये घुसून मारलं, आपल्यांवर हल्ला केला,भीमा कोरेगाव मध्ये हल्ला केला, अक्षय भालेराव नावाचा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता त्याला नांदेडमध्ये मारण्यात आले आणि आता हे बाळासाहेबांच्या प्रकृती वरती सुद्धा कमेंट्स व टिपणी करतात आणि आपण शांत बसणार आहोत का, कोणत्याही परिस्थितीत त्या प्रस्थापिकांना घरी बसविल्याशिवाय आपण थांबायचं नाही असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केल. पुढे त्यांनी असे म्हटले की, आपली औकात, आपली लायकी ही फक्त बटन दाबायची आणि मतदान करायची आहे. आपण वंचितांची पार्टीचा हा निर्धार याच्यासाठी केलाय की, आम्हाला त्यांना प्रस्थापितांना हे दाखवून द्यायचे आहे की, आमची लायकी फक्त तुम्हाला बटन दाबून जिंकून द्यायची नाही तर आमची लायकी स्वतः निवडून येऊन सभागृह गाजवायची आहे. वंचित बहुजन आघाडी स्वतःची एक खानावळ उभी करायची आहे. त्यामध्ये त्यांनी आपलेच ताट म्हणजे आपला मतदार संघ, आपलं जेवण म्हणजे आपलं मत, आपला वाढपी म्हणजे आपला उमेदवार आणि आपले खानावळ म्हणजे आपला पक्ष अशी साध्या आणि सोप्या भाषेत त्यांनी आपली संकल्पना मांडली. संग्रामपूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची ही पहिलीच प्रचार सभा असल्याने नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दर्शविला आहे.