कमलेश एम दुर्गे
ग्रामीण प्रतिनिधी अहेरी
अहेरीः विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये या वेळी वेगळीच लढत पाहायला मिळणार आहे.
भाग्यश्री आत्राम यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे उमेदवारी मिळताच ही निवडणुक पिता-पुत्रित होणार अशी हवा अहेरी विधानसभेत चालू होती परंतु दीपक आत्राम, अम्ब्रिशराव आत्राम यांनी अपक्ष उमेवारी अर्ज दाखल केला आहे. नेहमी प्रमाणे ही लढत आत्राम विरुद्ध आत्राम अशी असायची परंतु यंदाच्या निवडणुकीत हे चित्र बदलले असून आत्रामांच्या विरोधात नवीन चेहरा हनमंतु मडावी अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरल्याने चार दिग्गज सत्ता उपभोगलेल्या नेत्यांचे डोके दुखी तर ठरणार नाही ना? असे जाणकारांना वाटत आहे.
हनमंतु मडावी हे मूळचे आलापल्ली येथील असून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक आहेत. हनुमंतु मडावी यांना राजकीय अनुभव नसला तरी या क्षेत्रासाठी ते नवीन नाहीत.
त्यांनी आपल्या नोकरीचा 35 वर्षाचा कार्यकाळ या क्षेत्रात घालवलेला आहे.
त्यांच्या नोकरीच्या कार्यकाळात त्यांचा शांत, मनमिळाऊ स्वभाव यासाठी त्यांची प्रचिती- ओळख आहे
व त्यांच्या पाठीशी संपूर्ण सहयोगाने किंगमेकर म्हणून अजय कंकडालवार हे आहेत.
कंकडालवारांचा जनसंपर्क बघता आत्रामांसाठी ही निवडणुक सोपी ठरणार नाही. राजकारणातील खन्दा अनुभव मनमिळाऊ स्वभाव अहेरी विधानसभेतील पाचही तालुक्यातील जनसंपर्क लक्षात घेता हनुमंतु मडावी यांच्या बाजूने बाजी पलटेल कि काय ? असे राजकीय विश्लेषकांचे म्हणने आहे.
अजय कंकडालवार यांनी अहेरी विधानसभेतील जवळ जवळ ७० ते ८० ग्रामपंचायत काबीज केले आहेत. काही ग्रामपंचायतीत सदस्य तर काही ग्रामपंचायतीत संपूर्ण बॉडी बसविली आहे, मडावी यांच्या साठी युटर्न फॅक्ट ठरेल.