सिध्दार्थ कांबळे
ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
कुंडलवाडी : सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार यांच्या प्रयत्नाने सोयाबीन खरेदी केंद्रास परवानगी मिळाल्याने कुंडलवाडी शहर व परिसरात सर्व शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सदरील सर्व शेतकऱ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन सुनील बेजगमवार यांनी केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी सेवा सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार यांनी ४ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा मार्केटिंग अधिकारी राजेश हेमके यांची नांदेड येथे भेट घेऊन निवेदन दिले होते. जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी सदरील निवेदनाची दखल घेऊन सोयाबीन खरेदी करण्यासाठी सोसायटीला परवानगीचे पत्र दिले असून, कुंडलवाडी शहर व परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत सोसायटीच्या कार्यालयात सातबारा,आधारकार्ड, बँकेचे पासबुक घेऊन येऊन नोंदणी करावे असे आवाहन सेवा सोसायटी चे चेअरमन सुनील बेजगमवार यांनी केले आहे.