मारोती बारसागडे
तालुका प्रतिनिधी चामोर्शी
चामोर्शी : महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मेन रोड, चामोर्शी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. अनुसूचित जाती/जनजाती सांसदीय समितीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री मान. श्री. फग्गनसिंहजी कुलस्ते यांच्या हस्ते, तसेच भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि माजी खासदार अशोक.नेते जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. महायुतीचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासासाठी कटिबद्ध महायुतीची पहिली पायरी
उद्घाटन प्रसंगी अशोक नेते यांनी प्रचार कार्यालयाचे महत्त्व सांगताना म्हटले, “हे कार्यालय म्हणजे जनतेच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्याचे केंद्र आहे. महायुतीच्या विजयासाठी हे पहिले पाऊल आहे.त्यांनी आगामी निवडणुकीत एकजुटीने विजय मिळवण्याचा संकल्प व्यक्त केला. काँग्रेसच्या पन्नास-साठ वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या विकासाच्या तुलनेत, मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत केलेली प्रगती सर्वांसमोर आहे. अशोक.नेते म्हणाले,मोदी सरकारने देशाच्या विकासाच्या दिशेने उल्लेखनीय कामगिरी केली असून महाराष्ट्राच्या प्रगतीतही भर घातली आहे.
महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजनाअशोक नेते यांनी महिलांसाठी विशेष लाडकी बहीण.योजनेचा उल्लेख केला, ज्या अंतर्गत २.४० कोटी महिलांना लाभ मिळाला दरमहा १५०० रुपये, म्हणजेच वर्षाला १८,००० रुपये मिळणार आहेत.ही योजना नेहमी साठी चालू राहील या योजनेत सहाशे रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगती करत आहे,आपले सरकार महिला भगिनी,शेतकरी,शेतमजूर, युवकांना पाठिशी सदैव कटिबद्ध आहे असे ठामपणे सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची कल्पना मांडली.
कार्यकर्त्यांना एकजुटीने विजयासाठी आवाहन
उद्घाटन सोहळ्याने प्रचार मोहिमेला नवा जोम दिला आहे. कार्यकर्त्यांनी डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या विजयाचा निर्धार केला असून, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकजूट दाखवण्याची तयारी व्यक्त केली आहे. महायुतीच्या इतर नेत्यांनीही कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन करत, “डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या विजयातच महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग आहे,असे सांगितले.मान्यवरांनी उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत महायुतीच्या विजयी संकल्पाचा मंत्र देत उद्घाटन सोहळ्यातील उत्साहाने प्रचार मोहिमेला बळकटी मिळाली आहे. विजयाचा संकल्प आणि महाराष्ट्राच्या विकासाचा विश्वास दृढ करत, महायुतीचे कार्यकर्ते एकजुटीने काम करावे असेही यावेळी मनोगत मान्यवरांनी मांडले.उद्घाटन सोहळ्यात मंचावर उपस्थित मान्यवर:अनुसुचित जाती/जनजाती सांसदीय समितीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री मान.फग्गनसिंहजी कुलस्ते, मा.खा.अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी, माजी आमदार तथा भाजपा नेते डॉ. नामदेव उसेंडी,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे.भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके.किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष पिपरे.तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर,जेष्ठ नेते नामदेव सोनटक्के, बंगाली आघाडीचे विदर्भ संयोजक दीपक हलदार,जेष्ठ नेते रामेश्वर सेलूकर,राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष रिंकु नैताम भाजयुमो जिल्हा महामंत्री मधुकरभांडेकर.महिला मोर्चा तालुका अध्यक्षा अनिता राँय,नगरसेविका रोशनी वरघंटे, भाजपा नेत्या प्रतिमा सरकार, पठाण जी,राहुल नैताम,रामजी नरोटे,ओबीसी नेते तथा युवा नेते तसेच कार्यक्रमाचे संचालन भास्कर बुरे,ता.महामंत्री विनोद गौरकर, यांसह मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.