अरविंद बेंडगा तालुका प्रतिनिधी, डहाणू
डहाणू :- आंबिवली खडकीपाडा येथे 01 नोव्हेंबर 2024 रोजी दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव देणे, आत्मविश्वास वाढवणे आणि सामूहिक स्पर्धेचा अनुभव देणे होते. कार्यक्रमात चित्रकला, निबंध, पत्रलेखन, संगीत खुर्ची, वकृत्व यासारख्या स्पर्धांचा समावेश होता, ज्यात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देण्यात आली, तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना वह्या, पेन व शालेय साहित्य भेट देण्यात आले.सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले, ज्याने उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख पाहुणे श्री. आर. आर. पाटील सरांनी शिक्षणाचे महत्त्व आणि त्याची भूमिका स्पष्ट केली, तर श्री. प्रकाश भोईर यांनी “आदिवासीत्व” या विषयावर मार्गदर्शन केले.युवा एल्गार आघाडीचे अध्यक्ष ऍड. विराज गडग यांनी उच्च शिक्षणाचे महत्त्व आणि करिअरच्या संधींवर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले. कार्यक्रमात अरविंद बेंडगा, नितीन दिवा, अमोल करमोडा तसेच गावातील अनेक ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील युवा मंडळी आणि के. डी. ग्रूपच्या सदस्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.