दत्तात्रय नेटके
तालुका प्रतिनिधी आंबेगाव
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदचा सण…लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण आतुरतेने दिवाळीची वाट पाहत असतो. हिंदू धर्मात दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळी ही पाच सणाचा सण आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे पहिली पणती ही गाय वासरासाठी लावली जाते. हिंदू धर्मात गाईला आईचा दर्जा दिला जातो. त्यानुसार गाईचे व तिच्या वासराची पूजा केली जाते. वसुबारसेच्या दिवशी गाईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तिची पूजा केली जाते. साकोरे गावचे सरपंच अशोक मोंढवे यांनी त्यांच्या गीर गाईच्या गोठ्यात गायींची पूजा करत वसुबारस सन साजरा केला. गेल्या अनेक वसूबारस सण मोठ्या उत्साहात साजरा करतात व आपले गाई प्रति असलेले प्रेम दाखवतात.











