हुतात्मा नगरी महाळुंगे पडवळ गावचा पाठिंबा
दत्तात्रय नेटके. तालुका प्रतिनिधी आंबेगाव
मराठा समाजाच्या वतीने आंबेगाव विधानसभा मतदार संघातून एकमताने उमेदवार जाहीर झाला असून हुतात्मा नगरी महाळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मराठा आरक्षणाच्या लढाईत मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोलाची भूमिका बजावणारे बाबाजी दगडू चासकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून दिनांक २९ रोजी बाबाजी चासकर हे आपला उमेदवारी अर्ज घोडेगाव या ठिकाणी भरणार आहेत.
दिनांक २८ रोजी त्यांच्या गावी सर्व ग्रामस्थांनी बैठक घेऊन बाबाजी चासकर यांना एकमुखी पाठिंबा दिला असून या निवडणुकीत आम्ही तुमच्याबरोबर आहे असे गावकऱ्यांनी सांगितले आहे. तसेच दिनांक २९ रोजी समस्त ग्रामस्थ महाळुंगे पडवळ हे बाबाजी चासकर यांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
हुतात्मानगरी महाळुंगे पडवळ गावचे सुपुत्र हुतात्मा बाबु गेणू युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सर्वपरिचित बाबाजीदादा दगडू चासकर यांनी गावकऱ्यांनी दिलेल्या पाठिंबाबद्दल गावकऱ्यांच्या आभार मानले असून बर्याच वर्षांनंतर ( दशकानंतर) म्हणजेच आपले प्रेरणास्थान देशभक्त आण्णासाहेब आवटे यांचे नंतर आपल्या महाळुंगे पडवळ गावाला समाजामुळे व आपल्या ऐतिहासिक पार्श्वभूमी मुळे हि संधी चालुन आली आहे.त्या संधीचे सोने करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांनी माझ्या पाठीशी उभे राहून मला जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन बाबाजी चासकर यांनी केले आहे.


