प्रकाश केदारे
उपजिल्हा प्रतिनिधी परभणी
मानवत येथील गोपाळ कृष्ण गोरक्षण गोशाळेमध्ये दिवाळी सणाच्या प्रथम दिनी वसुबारस निमित्याने सायंकाळी सहा वाजता गोमतेची व गोपाळ कृष्णाच्या मूर्तीचे आरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी गोपाळ कृष्ण गोरक्षण कमिटीचे सदस्य ज्ञानेश्वर मोरे यांनी सह पत्नी गाईची पूजा केली. तसेच संजयकुमार लड्डा. शैलेश काबरा. गोपाळ कृष्ण गोरक्षण कमिटी चे व्यवस्थापक कुंजबिहारी काबरा ह.भ.प डाके महाराज, याबरोबर मानवत शहरातील आर्य वैश्य मंडळाच्या महिला च्या सदस्य ,राजस्थानी महिला मंडळाच्या सदस्या, शारदा महिला मंडळाच्या सदस्या, व इतर महिला व गोभक्त, गोरक्षण गोशाळेतील कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शुभप्रसंगी ह.भ.प. डाके महाराजांनी गोमाते विषयी आपले विचार व्यक्त करताना महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिल्याने राज्य सरकारचे अभिनंदन करुन आभार मानले.