महेंद्र गोदाम
ग्रामीण प्रतिनिधी घाटनांदुर .
अंबाजोगाई ,घाटनांदुर, परळी विधानसभेसाठी आज ऑल इंडिया पॅंथर सेनेचे मराठवाडा युवक उपाध्यक्ष दयानंद लांडगे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, दयानंद लांडगे यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी महामानव , परमपूज्य डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस नतमस्तक झाले, नंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथे नतमस्तक झाले, इतर महापुरुषांना अभिवादन केले, व उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ठिक ठिकाणी त्यांचे मोठे स्वागत हि केले, त्यांच्या सोबत असलेले त्यांचे सहकारी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जीवन गायकवाड, अनिल सावंत, नितीन गोदाम, बादल तरकसे, संतोष गोदाम, पवन शिंदे, लखन मिसाळ, निलेश मिसाळ, सोपान लांडगे, कमलाकर मिसाळ, अनिल मिसाळ, बंडू लांडगे, सौरभ वाघमारे, गोवर्धन मिसाळ, धनंजय मिसाळ, उमेश मिसाळ असे अनेक त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असा मोठा ताफा घेऊन गेले होते, दलित समाज बांधव ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे.