शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू: येथील भारतीय आयुर्विमा महामंडळा च्या कार्यालयात सतर्कता जागरूकता सप्ताह सोमवार २८ रोजी बापूसाहेब ठोंबरे (शाखा प्रबंधक) यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले सतर्कता जागरू कता सप्ताह २८ ऑक्टो ते ३ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे या निमित्ताने शाखा कार्यालयात शपथ घेण्यात आली नागेश पुराणिक यांनी द्रोपदी मुर्मु (राष्ट्रपति) यांचा संदेश वाचन केले व योगेश जयभाये यांनी प्रवीण के श्रीवास्तव (सेंट्रल विजिलेंस कमीशन)यांचा संदेश वाचन केले या वेळी संस्थेसाठी अखंडते ची प्रतिज्ञा घेतली १) आम्ही नैतिक व्यवसाय पध्दतींना प्रोत्साहन देऊ आणि प्रमाणिक पणा आणि सचोटी ची संस्कृती वाढवू २) आम्ही लाच देणार किंवा स्वीकार णार नाही ३) पारदर्श कता, उत्तरदायित्व आणि निष्पक्षता या वर आधारित चांगल्या कॉर्पोरेट प्रशासना साठी आम्ही वचन बध्द आहोत ४) आम्ही व्यवसाय चालवताना संबंधित कायदे नियम आणि अनुपालन यंत्रणा चे पालन करू ५) आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यां साठी आचार संहिता स्वीका रू ६) आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य प्रामाणिक पणे पार पाडण्यासाठी त्यांच्या कामाशी संबंधित कायदे, नियम इत्यादी बदल संवेदन शील करू ७) आम्ही भागधारक आणि समाजाच्या हक्कांचे आणि हिताचे रक्षण करू, प्रभाकर भांडवले, सुभाष राठोड,शमशोदिन शेख, शिवाजी आघाव,जाकेर शेख, मन्मथ देवडे,भालचंद्र बरडे,अमर पाटील, नामदेव मुंढे,राजकुमार नाईकवाडे संदिप जाधव आदी उपस्थित होते.