भागवत नांदणे सर्कल प्रतिनिधी वरवट बकाल
संग्रामपूर: जळगाव जामोद विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा अखेर पाचव्या दिवशी तिढा सुटला अन् माजी आमदार कृष्णराव इंगळे यांची कन्या महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीच्या सचिव सौ. स्वातीताई संदीप वाकेकर यांना पुन्हा महाविकास आघाडीकडून संधी देण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. संजय कुटे यांना काही दिवसांपूर्वी उमेदवारी जाहीर झाली असून त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू होती, नामांकन अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी कॉग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. जळगाव जामोद मतदारसंघाचे पक्षनेत्या तथा महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीच्या सचिव सौ. स्वातीताई वाकेकर यांना संधी मिळेल हे जवळपास निश्चित होते त्या अनुषंगाने त्यांनी विधानसभा मतदारसंघात प्रचार यंत्र राबवणे सुरू केले होते अखेर आज काँग्रेसने त्यांचे नाव अधिकृत शिक्कामोर्तब केले.जळगांव जामोद मधून अनेकजण इच्छुक असले तरी खरे फक्त चारच पदाधिकाऱ्यानी आपली शक्ती पणाला लावत होती. शेवटी आज महाविकास आघाडी कडून काँग्रेसच्या डॉ. स्वाती वाकेकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. एकेकाळी कॉग्रेसचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघात मागील 20 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. स्वाती वाकेकर यांना उमेदवारी मिळाल्याने चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त केले जात आहे.


