महेंद्र गोदाम ग्रामीण प्रतिनिधी घाटनांदुर
घाटनांदुर,विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार घाटनांदुरचे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे मराठवाडा युवा उपाध्यक्ष दयानंद लांडगे, धनंजय मुंडे यांच्या विरोधात उभे राहणार, . दयानंद लांडगे म्हणाले की या मतदार संघात दलितावर अन्याय अत्याचार खूप मोठ्या प्रमाणात होत आहे,तसेच बर्दापूर या ठिकाणी झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती,या मतदारसंघातील बेरोजगार युवकांना म्हणावे तसे काम नाही म्हणून बेरोजगार तरुण शिकून मुंबई पुणे औरंगाबाद या ठिकाणी रोजगारासाठी वणवण फिरत आहेत,ऊसतोड कामगार याच मतदारसंघात खूप आहेत त्यांच्यासाठी काय सोय केलीअसे ते म्हटलेम्हणून मी परळीमतदार संघातून थांबणार आहे,त्यांचे सहकारी ही त्यांना मदत करणार इंडिया पँथर सेनेचे बीड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अनिल सावंत,ऑल इंडिया पॅंथर सेनेचे युवाबीड जिल्हा उपाध्यक्ष नितीन गोदाम,अंबाजोगाई तालुका उपाध्यक्ष संतोष गोदाम,पवन शिंदे,निलेश मिसाळ,सोपान लांडगे असे अनेक त्यांचे पदाधिकारी त्यांना सहकार्य करणार.


