तुकाराम पांचाळ करखेलिकर ग्रामीण प्रतिनिधी धर्माबाद
नायगाव 89 विधानसभा मतदारसंघात सामाजिक भूमिका जोपासत प्रामाणिकतेने काम करणाऱ्या सच्चा कार्यकर्ता गजानन पाटील चव्हाण यांच्या भेटीला बच्चुभाऊ कडु दिनांक 24/ 10 / 2024 रोजी नांदेड ते देगलूर दौऱ्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चुभाऊ कडू साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांनी नायगाव शहर येथे विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व उमेदवार गजानन पाटील चव्हाण मित्रपरिवारांच्या कार्यालयास भेट देऊन विविध विषयावरती सखोल चर्चा करून नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक च्या भूमिकेने व विविध जनहितार्थ विषयाच्या अनुषंगाने आपण काम करूया अशा भावनेने चर्चा करण्यात आली या भेटीमुळे गजानन पाटील चव्हाण यांची चर्चा खूप रंगत आहे आणि ह्या भेटीमुळे गजानन पाटील चव्हाण यांची बाजू बळकट होवून चर्चेला उधाण आले आहे त्या ठिकाणी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव कल्याणकर , जिल्हा उपाध्यक्ष उद्धवजी भोसले, जिल्हा संघटक तालुका अध्यक्ष सह पदाधिकारी उपस्थित होते.