सुमेध दामधर ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा :- भाजपाकडून डॉ. संजय श्रीराम कुटे यांची उमेदवारी आठवडाभरापूर्वीच जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसकडून आज २६ ऑक्टोबर रोजी सकाळी डॉ. स्वाती संदीप वाकेकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे तर वंचित करून डॉ. प्रवीण पाटील यांचीही उमेदवारी घोषित झाली असून केवळ लिस्ट मध्ये अधिकृतपणे नावे येणे तेवढेच बाकी होते. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवारांच्या नावांची घोषणा झाल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होऊन भाजपाचे डॉ. संजय कुटे काँग्रेसच्या डॉ. स्वातीताई वाकेकर व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. प्रवीण पाटील यांच्यात विजयासाठी चांगलेच घमासान होईल अशी दिसून येत आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचे डॉ. संजय कुटे यांनी काँग्रेसच्या डॉ. स्वातीताई वाकेकर यांचा ३५, हजार २३१ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीतील उमेदवारांची आकडेवारी तपासल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला २०१४ च्या तुलनेत अतिशय कमी मतदान २९ हजार १८५ मतदान मिळाले होते. त्यामुळे नेहमी चार अंकी मतांच्या फरकांनी निवडून जिंकणारे डॉ. संजय कुटे २०१९ च्या निवडणुकीत याच अंकाच्या फरकाने निवडणूक जिंकले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडी उमेदवारांचा परफॉर्मन्स २०१९ पेक्षा चांगला राहील असे दिसून येते कारण मागील दोन ते तीन वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचा ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहाला तर त्यात कमलीची सुधारणा झाल्याचे दिसते. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभांना होणारी प्रचंड गर्दी हे त्याचे धोतक आहे. याशिवाय यावेळी वंचितचे उमेदवार डॉ. प्रवीण पाटील सर्वच बाजूने भक्कम दिसतात. त्यामुळे निवडणुकीत वंचितचा मतदानाचा आलेख हा निश्चितच वाढलेला दिसेल. दुसरीकडे काँग्रेसच्या डॉ. स्वातीताई वाकेकर यांनी २९१९ च्या निवडणुकीतील प्रभाव नंतर पाच वर्षे लोकांचे संपर्क कायम ठेवला असल्याने राजकीय वजन पूर्वीपेक्षा वाढले असून त्यांचा सकारात्मक परिणाम या निवडणुकीत दिसून येईल त्यामुळे या वेळच्या निवडणुकी डॉ. संजय कुटे, डॉ. स्वातीताई वाकेकर आणि डॉ प्रवीण पाटील यांच्यात चुरशीची लढत होऊन विजयाचे अंतर पाच हजार च्या आत राहील असा अंदाज व्यक्त करणे चुकीचे ठरणार नाही.


