प्रमोद शिंदे तालुका प्रतिनिधी माळशिरस
वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुक्याने वंचित चां जाहीर उमेदवार श्री. राज कुमार हे बदलून मिळावा वरिष्ठांकडे मागणी केली मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असून त्याकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर राजीनामे दिले आहेत.यावेळी माळशिरस तालुक्यातील माळीनगर, श्रीपुर, पिलिव, अकलूज, चांदापुरी, बचेरी आदी शाखेच्या अध्यक्ष, पदाधिकारी यांनी राजीनामे सादर केले, तसेच दिनांक 23/10/2024 रोजी नवनियुक्त 10 पैकि 5 पदाधिकरी यांनी जाहीर राजीनामे दिले आहेत. या राजीनाम्यामध्ये प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांना राजीनामा सादर केला असून त्यामध्ये वरिष्ठांनकडून गळचेपी होत असल्याने निषेध म्हणून राजीनामे देत असल्याचे नमूद केले आहे.सदर पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड. सुमित सावंत, जिल्हा उपाध्यक्ष नौशाद शिकलगार, माजी तालुका अध्यक्ष अभिजित जगताप, मा. तालुका उपाध्यक्ष समाधान साबळे, अक्षय देठे, लिंगेश्वर सातपुते, सागर सरतापे, विकास दळवी, मनोज जगताप, सुहास गायकवाड, शुभम वाघमारे, सुनील कांबळे, आदर्श गायकवाड, अजय कांबळे, जय खरे, कुंडलिक कांबळे, रामजी लोंढे, आदि सह बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.


