सुरेश नारायणे तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव: बाणगावच्या नदी किनाऱ्यावर लहान मुलगा वाल्मीक बापू इटनर वय १५ वर्ष या. खिर्डी हा मेंढी धुत असतांनाच त्याचा अचानक तोल जाऊन खोल पाण्यात पडला. त्याला पोहता येत नसल्यामुळे गटांगळ्या खात असताना आईने पाहिले. आई इंदूबाई बापू इटनर वय ३५ रा. खिर्डी वाचण्यासाठी गेल्या पण पाण्याची खोली न समजल्यामुळे त्यापण पाण्यात पडल्याचे मुलांचा मामा अंबादास केरुबा खरात वय २९ रा.खिर्डी हापण दोघा माय लेकांना पाण्यातुन काढण्यासाठी गेला पण दुर्दैवाने या तिघांचाही पाण्यात बुडवून दुर्दैवी मृत्यू झाला. ऐन दिवाळीच्या सणासुदीला दुर्दैवी घटना झाली त्यामुळे घडल्यामुळे परिसरावर आणि कुटुंबातील सदस्यांवर , नातेवाईक यांच्यावर शोककळा पसरली आहे.