देवलाल आकोदे सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
भोकरदन तालुक्यातील हसनाबाद जवळील मौजे वजीर खेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे विद्यमान मुख्याध्यापक शिक्षक श्री शिवाजी राऊत सर यांनी दिवाळी सुट्टी लागण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम राबवून शाळेतील विद्यार्थ्यांना दिनांक २६ ऑक्टोंबर २०२४ पासून दिवाळीच्या सुट्टया लागणार आहे.त्या निमित्ताने मुलांचे शाळेत प्रथमसत्र परिक्षा पेपर घेऊन,मुलांची एक दिवसीय सहल आयोजित करून गिरिजा नदीच्या तीरावर वसलेल्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाण श्री वज्रेश्वर शिव संस्थान वज्रखेडा महादेव मंदिर परिसरात अध्यात्मिक,शैक्षणिक विषयावर गप्पागोष्टी, हितगुज करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला,आणि दिवाळी पर्वावर मुख्याध्यापक शिवाजी राऊत सर व त्यांच्या सर्व शिक्षक मंडळींनी स्वखर्चाने मिठाई व फराळ वाटप करून विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टी जाहीर केली.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद दिसत होता. या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.








