सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव : आण्णांनी गेल्या पाच वर्षांत नांदगाव विधानसभा मतदारसंघात विविध विकासात्मक कामे केली. त्यामुळे अण्णांची शिवसेना (शिंदे गट) तर्फे पुन्हा उमेदवारी निश्चित होती. व मतदार संघातील कामामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. असे महाराष्ट्र शासन शिवछत्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक नेते विष्णू निकम म्हणाले तर आण्णांनी पाच वर्ष जनता जनार्दनाची सेवा केली. आता जनतेने अण्णांना विजयी करण्याची वेळ आहे. असे भाजपा उत्तर महाराष्ट्र व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दत्तराज छाजेड म्हणाले तर आर.पी.आय.पक्ष व आम्ही जोमाने ताकदीने आण्णांच्या सोबत राहुन काम करणार असल्याचे अपील तेलुरे यांनी म्हटले आहे.
आमदार सुहास अण्णा कांदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याबद्दल जल्लोष करताना मनोगत व्यक्त केले नांदगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाची यादी जाहीर करण्यात आली यात नांदगाव विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार सुहास अण्णा कांदे यांना उमेदवारी देण्यात आली आज महायुतीच्या कटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला नांदगाव येथील आमदार संपर्क कार्यालय येथे महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो नरेंद्र मोदी साहेबांचा विजय असो रामदास आठवले साहेबांचा विजय असो आमदार सुहास अण्णा कांदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा कृष्णा देण्यात आल्या फटाक्यांची आता शिवाजी करण्यात आली तसेच पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.