सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव : दहेगाव येथील आण्णा साळुबा कर्नल यांच्या शेतात काम करण्यासाठी आज सकाळी नांदगाव शहरातील दत्तनगर आणि नेहरु नगर गंगाधरी येथील मजुरांना दहेगावला घेऊन जाणारा ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली नाल्यात पलटी झाला. ट्रॅक्टरच्या पुढे बसलेल्या महिला मजूर आशाबाई चंद्रभान त्रिभुवन वय ६५ रा..नेहरुनगर, नांदगाव, व ताराबाई रविंद्र भवर वय ४० रा.दत्तवाडी गंगाधरी नांदगाव या जागेवरच ठार झाल्या तर अरुण दशरथ यशवंते हे जखमी झाले आहेत. ट्रक्टर चालक शिंदे व इतर महिला मजूर बचवल्या आहे. नांदगावचे पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी तातडीने अपघाताची माहिती घेतली .


