मुकेश बागडे
तालुका प्रतिनिधि सावनेर
सावनेर – सावनेर- कळमेश्वर विधानसभेचे माजी आमदार व माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी सौ अनुजा केदार यांनी आज आपला नामांकन अर्ज सावनेर तहसील कार्यालय येथे दाखल केला . सुनील केदार हे नागपूर विदर्भातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील एक मोठे नेते असून मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील रामटेक लोकसभा मधील खासदार निवडून येण्याचे संपूर्ण श्रेय सुनील केदार यांना जात असल्याची चर्चा आहे .आणि या विधानसभा निवडणुकीत नागपूर ग्रामीण मधील सहा विधानसभा ची धुरा त्यांच्याच कडे आहे . सुनील केदार यांच्यावर झालेल्या जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना झालेली शिक्षा त्यामुळे त्यांना या निवडणुकीत नामांकन अर्ज करता येणार नसल्याने त्यांनी काँगेस पक्षाच्या वतीने सौ अनुजा सुनील केदार यांना उमेदवारी देवून निवडून आणण्याचा संकल्प केला असल्याचे बोलले जात आहे . मात्र भाजपा कडून आतापर्यंत कुठल्याही उमेदवाराचे नाव आले नसून सुनील केदार यांच्या पत्नीच्या विरोधात महिला उमेदवार भाजपा देईल असे बोलले जात आहे . नामांकन अर्ज सादर करताना सौ अनुजा केदार यांच्या सोबत नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे , गोविंद ठाकरे प. स. सभापती सावनेर , रवींद्र चीखले सभापती कृषी उत्पन्न बजार समिती सावनेर , बाबा पाटील कृषी सभापती उत्पन्न बाजार समिती कळमेश्वर अनिल राय उपाध्यक्ष नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी हे गणमान्य उपस्थित होते .