विद्यार्थिनींची पालकांना पोस्टकार्डद्वारे भावनिक साद .
आगळावेगळा मतदान जनजागृतीचा उपक्रम
कैलास शेंडे
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार:तळोदा- ‘प्रिय आई-बाबा आमच्या उज्वल भविष्यासाठी मतदान करा’ अशा आशयाचे भावनिक पोस्टकार्ड लिहून व पोस्टाद्वारे पाठवून विद्यार्थ्यांनी पालकांना मतदान करण्यासाठी विनंती केली आहे तळोदा येथील गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या माध्यमिक विद्यालयात बुधवार (दि. 23) मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले होते.राज्यात विधानसभेच्या निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे या निवडणूकीमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे यासाठी स्वीप पथकाचे प्रमुख तथा गटशिक्षणाधीकारी शेखर धनगर केंद्रप्रमुख कांतीलाल पाडवी, शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव ज्ञानदेव केदार यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती अभियान तालुक्यात राबविण्यात येत आहेत नागरीकांनी मतदान प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन लोकशाही बळकट करावी या उद्देशाने विविध मतदान जनजागृतीचे कार्यक्रम राबवीण्यात येत आहेत

विद्यार्थ्यांच्या आई-वडीलांनी मतदानाला प्राधान्य देऊन मतदान करावे या उद्देशाने तालुक्यातील गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालयात उल्हास मगरे मुख्याध्यापक मिलिंद धोदरे यांच्या संकल्पनेतून मतदान करण्या बाबतची विनंती करणारे पोस्टकार्ड विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडीलांना
लिहून त्यांना मतदान करण्याची विनंती पत्राव्दारे केली. या उपक्रमात पोस्टकार्ड वर
प्रिय आई बाबा ,
सादर प्रणाम, आई बाबा लवकरच विधानसभा निवडणुकी चा माध्यमातून आपल्या राज्यात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा होत आहे या उत्सवात सर्व मतदार सामील झाले तरच लोकशाही वाचेल आणि तुमच्या लाडक्या मुला मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण सुद्धा राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करा व या देशातील लोकशाही बळकट करावी ही तुमच्या लाडली ची आपणांस आग्रहाची विनंती आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या या लाडकीच्या प्रेमाखातर अवश्य मतदान कराल आपलीच लाडकी सही व नांव असा मजकूर लिहून प्रत्येक विद्यार्थिनीने आपल्या आई वडिलांच्या नांवाने आपल्या घरच्या पत्त्यावर सध्या सोशल मीडियाच्या युगात कालबाह्य होणारे पोस्टकार्ड पाठवून मतदान करण्यासाठी भावनिक साद घातली आहे या साठी विद्यार्थिनी स्वतः पोस्टात गेल्या होत्या या उपक्रमासाठी तळोदा पोस्ट निरीक्षक सुशांत चार्जन व पोस्ट ऑफिस चे सहकार्य घेण्यात आले या उपक्रमाला विद्यार्थीनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या वेळी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व सांगण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चेतनकुमार पवार से नि मुख्याध्यापक निमेश सूर्यवंशी शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद धोदरे, से नि शिक्षक महेश मगरे उल्हास मगरे उपस्थित होते या साठी नरेंद्र महाले योगेश पाटील अनिल इंदिस दिलीप तडवी वैशाली देवरे अनिल मगरे हिरालाल पाडवी धनराज केदार सुदाम माळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱयांनी परिश्रम घेतले.
या आगळ्यावेगळ्या भावनिक मतदान जागृतीचे पालकांकडून व सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे


