नागोराव शिंदे
तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या की मतांसाठी गावात किंवा तालुक्यातील उमेदवार फिरतानी मोठ मोठे आश्वासन देतात आम्ही विकास करू पण निवडून आले की, त्यांना जनतेला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडतो . म्हणून जनता आता उमेदवाराला त्यांची जागा दाखुन या सर्व प्रकाराला छेद देत व लोकांच्या आडचणीच्या काळात सरकारी खर्चातून काम होण्याची वाट पहात बसण्यापेक्षा डोलारी व पळसपूर गावातील लोकांनी लोक वर्गणी करून स्वतःच्या खिशातून घाम गाळून जमा केलेल्या पैसाने गांजेगाव ते डोलारी रसत्यावरील खड्डे बुजविले .
गांजेगाव व डोलारी गाव विदर्भ व मराठवाडा जोडणारा रस्ता आहे . त्या मुळे हे गाव नेहमीच लोकप्रतीनिधींच्या विकासापासून दूर रहाते. या गावातून एक उमरखेड तालुक्यात सगळ्यात मोठा बाजार पेठ असलेला ढाणकी गाव आहे तर दुसऱ्या बाजूला हिमायतनगर तालुका तसेच रेल्वे स्टेशन आहे . हा रस्ता लोकांसाठी महत्वाचे असून या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले असल्यामुळे हा रस्ता ये जा करण्यासारखा राहीला नव्हता अनेक वर्षापासून हा रस्ता करण्याची मागणी शासन दरबारी पडून आहे मात्र ती पुर्ण झाली नाही. लोकांना या रस्त्याने ये जा करणेही कठीण झाल्यामुळे शेवटी गावातील लोकांनी शासनाच्या निधीची वाट न पहाता आज लोक वर्गणी करून स्वतःच्या खिशातून या रस्त्याचे काम केले.तसेच या कामासाठी गांजेगाव येथील स्नेहा गोल्ड कंपनी ने आपल्या स्वतःच्या गाड्याने मुरूम देऊन सहकार्य केले आहे हे काम करून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नागोराव शिंदे पळसपुरकर विठ्ठल गायकवाड तर ढाणकि येथील पत्रकार शेख इरफान यांनी मोलाचे सहकार्य केल्याने उमरखेड आगाराची एसटी बस ढाणकि मार्ग डोलारी पळसपुर हिमायतनगर लवकरच सुरू होईल असे प्रवासी महामंडळाचे तालुका अध्यक्ष शेख इरफान यांनी सांगितले आहे