महेंद्र गोदाम
ग्रामीण प्रतिनिधी घाटनांदुर
बीड, घाटनांदुर परळी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी गुरुवारी 24 रोजी निवडणुकीसाठीचा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, धनंजय मुंडे यांनी कुठलेही शक्ती प्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज भरणे पसंत केले, अर्ज भरते वेळेस पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत विधानसभा उमेदवारी अर्ज भरला बीडच्या परळी तहसील कार्यालय मध्ये भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या सोबत मुंडे यांनी विधान सभे करिता उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळेस पाच लाडक्या बहिणी सोबत धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच बीडचे जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी भाऊ शिरसाट तसेच राजेश्वर आबा चव्हाण ,अजित दादा देशमुख,राजेभाऊ अवताडे ,घाटनांदुरचे माजी सरपंच ज्ञानोबा (बप्पा )जाधव,माजी उपसरपंच बाळासाहेब देशमुख ,महबूब भैया शेख,गोविंद फड,दादा वैद्य व इतर पदाधिकारी सोबत होते.