तेजस ढाकणे
ग्रामीण प्रतिनिधी शेवगाव
सर्वसामान्य जनता गरिबांचा आवाज आम्ही आहोत. त्यामुळे माझी उमेदवारी साखर विरुद्ध भाकर अर्थात अशी राहणार आहे. गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी यांना न्याय देण्यासाठी व तालुक्याचे विकासासाठी जनतेच्या आशीर्वादाने मी अपक्ष फॉर्म भरत असल्याचे प्रतिपादन शेवगाव पाथर्डी २२२ विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार मा.जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदा काकडे यांनी केले.आज मोठे शक्ती प्रदर्शन करत जि.प. सदस्या सौ हर्षदा काकडे यांनी गुरूपुष्प अमृत या मुहूर्तावर शेवगाव पाथर्डी विधानसभेसाठी अपक्ष निवडणूक लढण्यासाठी फॉर्म भरला. यावेळी मतदार संघातून लोकांनी अभूतपूर्व अशी गर्दी केली होती. यावेळी सौ.हर्षदा काकडे यांना पाठिंबा देण्यासाठी जनता पदर खर्चाने मोटरसायकल, सायकल, एसटी, पायी अशा पद्धतीने प्रचंड संख्येने एकत्र आली होती. यावेळी जमलेल्या समुदाय पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.यावेळी सौ.काकडे म्हणाल्या की, प्रत्येकाने आता आपापले मित्र, नातेवाईक, सोयरे यांचेपर्यंत जाऊन भेटा. त्यांना आपल्या कामाची पद्धत सांगा. व विकासाच्या मुद्द्यावर सोबत राहायला सांगा. कुणी काहीही सांगितले तरी आता निवडणुकीतून माघार नाही. मला या मतदारसंघातील विकासाचा मोठा बॅकलोक भरून काढायचा आहे. मागील लोकप्रतिनिधींनी जनतेच्या विकासाकडे दुर्लक्ष करून स्वतःचे कुटुंबाचा विकास केलेला आहे. यांच्या घराबाहेर हे सत्ता जाऊ देत नाहीत. प्रत्येक पक्षात हे जागा धरून बसले आहेत. परंतु आता आमच्याकडे गोरगरीब सर्व समाजातील जनता माझ्याजवळ आहेत व त्यांचे जीवावर या साखर सम्राटांचा पराभव आपण करणार आहोत असेही सौ.हर्षदा काकडे म्हणाल्या.यावेळी ॲड.शिवाजीराव काकडे, जगन्नाथ गावडे यांचेसह शेवगाव पाथर्डी मतदार संघातील महिला, युवक शेतकरी व सर्वसामान्य जनता हा प्रचंड मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
चौकट
सौ.हर्षदा काकडे यांच्या पृथ्वी निवासस्थानावरून वाजत गाजत शक्ती प्रदर्शन करत मिरवणूक काढून डॉ.बाबासाहेब आंबेडकर, निद्रिस्त पावन गणपती, छत्रपती शिवाजी महाराज, स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे , राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालयात दुपारी 1 वाजता सौ हर्षदा काकडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.


