सुदर्शन मंडले
ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर
आळेफाटा ता. २४ आळे व आळेफाटा पंचक्रोशीतील लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गावातील विशिष्ट लोकांनी एकत्र येऊन गेली चार वर्ष ही स्पर्धा चालू केली आहे.
यावर्षी मंगळवार दि.२२ऑक्टोबर २०२४ते सोमवार दि.२८ऑक्टोबर २०२४ पर्यंत स्पर्धा नाव नोंदणी चालू आहे नंतर दि. २८ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२४ पर्यत तयार करण्यात आलेल्या किल्ल्याचे परीक्षण करण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ६६६६/- रुपये विनोद शेळके (उदयोजक माऊली मोटर्स ) व देविदास पाडेकर (सह्याद्री हायड्रॉलीक ),द्वितीय बक्षीस ५५५५/- विशाल भुजबळ (व्ही. बी. बिल्डर अँड डेव्हलपर ),तृतीय बक्षीस ४४४४/- उल्हास सहाणे (माऊली चारा सप्लायर ),चतुर्थ बक्षीस ३३३३/- मिननाथ शिंदे (माजी उपसरपंच ग्रा. पं आळे ),पाचवे बक्षीस २२२२/- चंद्रकांत डोके (आदर्श शिक्षक पुरस्कृत ),सहावे बक्षीस ११११/- साई आधार सेवा संस्था यांच्याकडून देण्यात येणार आहे. तसेच सहभागी किल्लेदारांना ऐतिहासिक किल्ला दर्शन सहल सौरभ डोके यांच्या मार्फत केले जाणार आहे. तसेच स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे.तरी सेवेची ठायी तत्पर ग्रुपच्या वतीने आदेशकुमार दळवी यांच्या व्हाट्सअप नंबर ९९७५५७५५३६ या नंबरवर किल्ल्याचे फोटो पाठवावे हे आवाहन करण्यात आले. व नाव नोंदी साठी निलेश दत्तात्रय भुजबळ, दत्तात्रय औटी, निलेश डोंगरे,आदेशकुमार दळवी यांच्याशी संपर्क साधावा.