१९९० नंतर लांडेवाडी मध्ये नामदार दिलीपराव वळसे पाटलांचे भव्य दिव्य स्वागत
दत्तात्रय नेटके
तालुका प्रतिनिधी आंबेगाव
आंबेगाव : आंबेगाव विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज आज घोडेगाव या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे दाखल केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत राज्यमंत्री माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पूर्व वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, अरुण गीरे, किरण ताई वळसे पाटील, सुभाष मोरमारे उपस्थित होते. तहसील कार्यालयाच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वळसे पाटील यांच्या नावाच्या घोषणा देऊन विजयाच्या शुभेच्छा दिल्या. आंबेगाव विधानसभेसाठी एकूण पाच उमेदवारांनी आतापर्यंत नामनिर्देशन पत्र भरले आहेत. मंचर येथे जाहीर सभेनंतर वळसे पाटील यांनी घोडेगाव येथे तहसील कार्यात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान आंबेगाव विधानसभेसाठी एकूण सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये अथर अब्बास उर्फ राजू इनामदार अपक्ष, लक्ष्मण महादू निकम अपक्ष, मंगेश बापू शिंदे अपक्ष, अशोक दत्तात्रय काळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष असे पाच नामनिर्देशन पत्र यापूर्वी दाखल झाले आहेत. आंबेगाव विधानसभा निवडणुकीसाठी आजपर्यंत एकूण ४० उमेदवारांनी ७६ नामनिर्देशन पत्र नेले आहेत. दरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी अर्ज भरण्यापूर्वी त्यांच्या निरगुडसर गावात श्री दत्त मंदिरात जाऊन दत्त महाराजांच्या दर्शन घेतले त्यानंतर अवसरी खुर्द येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन मंचर येथे निर्धार मेळाव्यात जाहीर सभेत त्यांनी उपस्थित नागरिकांना आंबेगाव तालुक्याची पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी देऊन अष्टविजय साकार करावा असे आव्हान केले. त्यानंतर ३५ वर्षानंतर लांडेवाडी येथे वळसे पाटील यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले.


