शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
जिंतूर :दि.24 जिंतूर विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हिश्श्यास सोडण्यात आला असून माजी आमदार विजय भांबळे यांची या पक्षाने उमेदवारी सुध्दा निश्चित केली आहे.जिंतूर मतदारसंघ आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षास सुटणार हे स्पष्ट होते. विशेषतः माजी आमदार भांबळे यांनाच त्या पक्षाद्वारे उमेदवारी जाहीर होणार हे ही स्पष्ट होते. परंतु, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश नागरे यांनी जिंतूर व सेलूत पत्रकार परिषदेतून आघाडीतून जिंतूर मतदारसंघ काँग्रेसच्या हिश्श्यास सुटणार आहे, असा वारंवार दावा केला. परंतु, त्या दाव्यात तथ्य आढळून आले नाही. आघाडी तील पक्षश्रेष्ठींनी ओळीनेसुध्दा त्या अनुषंगाने कोणतेही संकेत दिले नाहीत. त्याचा परिणाम नागरे हे गेल्या दोन दिवसां पासून कमालीचे हिरमुसले. आघाडीतून राष्ट्रवादीच्या हिश्श्या सच मतदारसंघ सुटणार हे खात्रीने कळाल्यानंतर नागरे यांनी अन्य पर्यायांचा विचार सुरु सुध्दा सुरु केला. त्यामुळेच जिंतूरातून भांबळे हेच उमेदवार असणार हे स्पष्ट होत होते दरम्यान भांबळे यांनी पक्ष श्रेष्ठींनी दिलेल्या संकेताप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासूनच या मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरु केली. पक्षाद्वारे उमेदवारी जाहीर होईलच, हे गृहीत धरुन जिंतूर व सेलूतील वाडी तांड्यां पर्यंतपोहोचण्याकरीता कसरती केल्या. ऐनकेन कारणा निमित्ताने ते या मतदारसंघात सातत्याने संपर्कात राहिले आहेत. त्यामुळे च भांबळे यांची एक फेरीसुध्दा केव्हाच पूर्ण झाली. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणा र्या या मतदारसंघात लढाई सोपी नाही. गेल्या निवडणूकीत सुध्दा अल्प मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. हे ओळखून भांबळे यांनी चांगलीच कंबर कसली आहे. त्यांनी गावागावी जाऊन संपर्क साधला असून मतदारसंघातील सर्वांच्या समस्या जाणून त्या कश्या सोडविता येईल याकडे सातत्याने पाठपुरावा करून सोडविण्याचा पर्यत्न केला आहे.त्यात जरांगे पाटील यांच्या भूमिके कडे सुद्धा ते लक्ष ठेवून आहेत.कारण मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या करिता मतदारसंघा तील सर्व गरजवंत मराठा समाज पाटील म्हणतील तस हे होणार आहे. जर मराठा आरक्षणासाठी एखादा उमेदवार पाटलानी दिला तर खरी चुरस निर्माण होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.त्यात आमचं ठरलंय अशी भूमिका घेऊन कांग्रेस पार्टीचे सुरेश नागरे हे बंडखोरी करीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. एकदरीत सेलू जिंतूर विधानसभा चुरशीची होणार आहे यात शंका नाही.


