भगवान कांबळे
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड – तत्वदृष्ट्या पाहीले तर पोलीस प्रशासनाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे सर्व नागरीकांच्या सुरक्षेच्या बाबतीत समानता आणि बंधुत्वाच्या बाबतीत पोलीस प्रशासन नेहमी सर्तक असते आणि आपल्या विभागातील नागरिकांना पण सर्तक राहण्याचे आवाहन करत सर्व ग्रुप अँडमिन व सभासद समाजमाध्यम यांना आव्हान केले आहे की विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्राभर दिनांक १५-१०-२०२४ रोजी पासून आर्दश आचारसंहिता लागू असुन निवडणूक प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया होणार असून दरम्यान मा जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशान्वये नांदेड जिल्हास्थळ सिमेच्या हद्दीमध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम अन्वये ३७(१)(३) चे प्रतिबंधक आदेश तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहीता २०२३ चे कलम १६३ अन्वये निर्बंध घालण्यात आले आहे असे नांदेड पोलीस विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
कोणत्याही उमेदवारांशी संबंधित त्यांचे वैयक्तिक कौटुंबिक अगर सामाजिक स्तरावर अवहेलना होईल असे आक्षेपार्ह टिकाटिपण्णी मजकूर फोटो व्हिडिओ करून प्रसारित करणे अथवा आलेल्या संदेशावर आपले मत प्रकट करणे किंवा पुढे पाठवणे अशा बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहे कोणत्याही धर्माच्या लोकांच्या धार्मिक भाषीक तसेच जातीत व्देष पसरविणारे आक्षेपार्ह मजकूर फोटो व्हिडिओ करून प्रसारित करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे कुठल्याही व्हाट्सअप ग्रुप मध्ये आचारसंहितेचा भंग होईल अथवा दोन गटात वाद होईल असा मजकूर फोटो व्हिडिओ टाकल्याचे निर्देशनास आल्यास संबंधित व्यक्तीसह ग्रुप अँडमिन जबाबदार असणार आहे वरील सुचणेचे पालन करणे हे आपल्याला बंधनकारक राहील आपलेकडुन आदर्श आचारसंहिता भंग झाल्यास आपणास जबाबदार धरण्यात येऊन आपले विरूध्द कडक कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी असे नांदेड पोलीस विभागाने दिनांक २३-१०-२०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपल्या विभागातील नागरिकांना आव्हान केले आहे.