शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू :दि. 23 ऑक्टो. रोजी क्युरीअस किड्स सेलू या शाळेत यंदा ‘ग्रीन दिवाळी’ साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपारिक फटाके न वाजवता प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश देण्यासाठी बलून फोडून उत्सव साजरा केला. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक दिवाळीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
कार्य क्रमात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध रंगछटा वापरून पर्यावरण संरक्षणाच्या कल्पना व्यक्त केल्या.याशिवाय विविध उपक्रमांची रेलचेल होती, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जन शीलतेला वाव मिळा ला या निमित्ताने शाळेतील मुलांनी आपल्या जुन्या कपड्यांचे दान करून सामाजिक बांधिल कीचे भान जपले.
गरजू लोकांसाठी केलेले हे योगदान विद्यार्थ्यांना समाज सेवेचे महत्त्व शिकव णारे ठरले.सॅनरो एज्यु केअर चे चेअरमन डॉ संजय रोडगे, डॉ सविता रोडगे,प्रगती क्षीरसागर,थूआन मॅडम व शिक्षक वर्गाने या ग्रीन दिवाळी उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे अभिनंदन केले.