प्रतिनिधी: भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
डहाणू,सोनाळे-दि.२३ ऑक्टोबर. समाजात रक्तदान हे महत्त्वपूर्ण कार्य आहे, जे अनेकांचे जीव वाचवण्यास कारणीभूत ठरते. यारी दोस्ती फाउंडेशनच्या सदस्यांनी असेच एक महत्त्वपूर्ण कार्य आज पार पाडले. एक लहान मुलगी दीक्षा दिलीप उमतोल (सोनाळे)गंभीर अवस्थेत वेदांत रुग्णालय धुंदलवाडी येथे उपचार घेत होती. डॉक्टरांनी तीला पुढील उपचारासाठी O+ रक्ताची तातडीची आवश्यकता आहे असं सांगितलं. रुग्णाच्या नातेवाईकांनी लगेचच जवळपासच्या रक्तपेढींशी संपर्क साधुन रक्ताची विचारपूस केली पण त्यांच्याकडे ते रक्त उपलब्ध नव्हते.शेवटी रुग्णाच्या कुटुंबीयांनी यारी दोस्ती फाउंडेशनकडे मदतीची विनंती केली. त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत, फाउंडेशनच्या श्री अशोक हरवटे (विक्रमगड) या सदस्यानी तत्परता दाखवत रक्तदानासाठी पुढाकार घेतला. या रक्तदानामुळे रुग्णाच्या जीवनात नवा प्रकाश आला आहे आणि रुग्णाचे प्राण वाचले आहेत.
यारी दोस्ती फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून रक्तदान, अन्नदान, आणि इतर समाजसेवी कार्यामध्ये अग्रेसर आहे. संस्थेचे उद्दिष्ट मानवतेची सेवा करणे आणि गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे आहे.
रुग्णाच्या कुटुंबीयांनी या कार्याबद्दल आभार व्यक्त केले असून, फाउंडेशनच्या सदस्यांनी अशा प्रकारे समाजसेवा चालू ठेवण्याचा निर्धार केला आहे. “आमची मैत्री केवळ बोलण्यापुरती नसून ती कृतीतून दाखवण्याची आहे,” असे फाउंडेशनच्या सदस्यांनी सांगितले.
ह्या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले की, रक्तदान हे जीवनदान आहे, आणि यारी दोस्ती फाउंडेशन समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सदैव तत्पर आहे.


