जलील शेख
तालुका प्रतिनिधी,पाथरी
मी कुणाचही वाईट केलेले नाही.उलट राजेश विटेकरला विधान परिषद मिळाल्यानंतर मी त्यांचे जंगी सत्कार केले होते.परंतु त्याच विटेकरांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे.म्हणून माझा विश्वासघात करणाऱ्या बेईमानाला धडा शिकवण्यासाठी येत्या 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मी विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आहे.तेव्हा माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यादिवशी उपस्थित राहावे असे आवाहन करताना आज महात्मा फुले फंक्शन हॉल पाथरी येथे घेण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सईद खान यांनी मत व्यक्त केले.
शिवसेना नेते सईद खान हे शिवसेनेतर्फे महायुतीकडून पाथरी विधानसभेसाठी इच्छुक असताना विधान परिषद सदस्य राजेश विटेकर यांनी आपले राजकीय वजन वापरत राष्ट्रवादी अजितदादा पक्षातर्फे आपल्या आईसाठी उमेदवारी मिळवल्याने सईद खान यांचा भ्रमनिरास झाला होता.माझं वाईट करणाऱ्यांचा देव कधीच भलं करत नाही असे म्हणत मला सोबत राहून धोका देणाऱ्या राजेश विटेकरांना धडा शिकविण्यासाठी तसेच सर्वसामान्यांच्या भल्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे सईद खान यांनी स्पष्ट केले.यावेळी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. कार्यक्रमात शेकडो पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता .