महागांव तालुक्यातिल ७५ टक्के मतदार साहेबराव कांबळे यांना ओळखतच नाहीत
अनिस सुरैय्या
तालुका प्रतिनिधि महागांव
महागांव: सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झाली असुन येणा-या विधानसभेच्या निवडणुकी मध्ये काॅंग्रेस पार्टी कडुन इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पक्षाकडुण उमेदवारी मिळविण्याकरीता रस्सीखेच चालु केली आहे.यामध्ये उमरखेड-महागांव विधानसभे करीता काॅंग्रेस पार्टी कडुन इच्छुक असलेल्या साहेबराव कांबळे यांना विधानसभा क्षेत्रातील ७५ टक्के मदतार ओळखतच नाहीत.तरी सुध्दा साहेबराव कांबळे हे कोणाच्या व कशाच्या भरवश्यावर उमेदवारी मागत आहेत असा प्रश्न सर्व मतदारांना पडला आहे.तसेच साहेबराव कांबळे हे फक्त तालुक्यातिल मोठ्या नेत्यांना भेट देवुन निघुन जातात ग्रामीण भागातिल कोणत्याही कार्यकर्त्यांना भेटुन चर्चा सुध्दा करीत नाहीत.त्यामुळे विधानसभा क्षेत्रातिल अनेक कार्यकर्ता नाराज असल्याचे चीत्र सुध्दा उमरखेड-महागांव विधानसभे दीसत आहे.उमरखेड-महागांव विधानसभा क्षेत्रात काॅंग्रेस पार्टी मधिल असलेली आपसी गटबाजी ही फक्त महाराष्ट्रच नव्हेत तर दील्लि पर्यंत फेमस झालेली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत उमरखेड-महागांव विधानसभा क्षेत्रातिल काॅंग्रेस पार्टीमधिल आपसी गटबाजी मुळे काॅंग्रेस पार्टीला आपली एक सीट गमवावी लागली होती,आता परत साहेबराव कांबळे यांना उमेदवारी देवुन काॅंग्रेस पार्टी पुन्हा तीच भुल करुन आपली एक सीट गमावणार का,याकड़े सर्व मतदारांचे लक्ष लागले आहे.


